पारेगाव येथे आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:04 IST2020-07-21T14:04:18+5:302020-07-21T14:04:45+5:30

येवला : तालुक्यातील पारेगाव येथे पिहला कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात जंतुनाशक औषधाची फवारणी केली आहे.

Health check up at Paregaon | पारेगाव येथे आरोग्य तपासणी

पारेगाव येथे आरोग्य तपासणी

येवला : तालुक्यातील पारेगाव येथे पिहला कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात जंतुनाशक औषधाची फवारणी केली आहे. तर गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पारेगाव येथील ५४ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. ग्रामपंचायतीने रूग्णाचे वास्तव्य परिसर सील केला आहे. मुखेड आरोग्य केंद्राच्या पथकाकडून गावातील प्रत्येक नागरिकांची थर्मल गण व आॅक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. याप्रसंगी ग्रामसेवक काकडे, कर्मचारी शिवाजी भोसले, मछिंद्र माळी, अंगणवाडी सेविका मनिषा पाठे, आशा पाठे, पोलीस पाटील हरिष गांगुर्डे आदी या मोहीमेस सहकार्य करत आहेत.

Web Title: Health check up at Paregaon

टॅग्स :Nashikनाशिक