न्याहारखेडे येथे आरोग्य शिबिर यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:23 IST2020-10-18T22:15:06+5:302020-10-19T00:23:00+5:30
नगरसूल : येवला तालुक्यातील नारखेडे बू. येथे शनिवारी आरोग्य शिबिर राबवण्यात आले.

न्याहारखेडे येथे आरोग्य शिबिर यशस्वी
नगरसूल : येवला तालुक्यातील नारखेडे बू. येथे शनिवारी आरोग्य शिबिर राबवण्यात आले. कोरोनासारख्या महामारीने देशात थैमान घातले असल्याने ग्रामीण भागातील मणका गुडघेदुखी यासारख्या इतर आजारांचे रुग्ण तालुक्यातील रुग्णालयात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने येवला तालुक्यातील शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख ईदरीस मुलतानी यांच्यावतीने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत मोफत मास्क, सॅनिटायझर त्याचबरोबर औषध वाटप करून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई गरुड तसेच भाऊसाहेब गरुड यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास सहारा हॉस्पिटलचे संचालक इम्रान सय्यद, डॉ. शिल्पेस माळी, डॉ. निसात शहा समिर अन्सारी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरास बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी ईदरीस मुलतानी, कफील मौलाना, सिकंदर मुलतानी आदींचे सहकार्य लाभले.(फोटो १८ नगरसूल १)