मुख्याध्यापकाची आत्महत्त्या
By Admin | Updated: October 25, 2015 23:43 IST2015-10-25T23:43:05+5:302015-10-25T23:43:29+5:30
मुख्याध्यापकाची आत्महत्त्या

मुख्याध्यापकाची आत्महत्त्या
नाशिक : आडगाव शिवारातील एका मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्रकार रविवारी (दि़२५) सकाळच्या सुमारास उघडकीस आला़ मयत मुख्याध्यापकाचे नाव आबासाहेब खंडेराव माळोदे (५७, प्लॉट नंबर ८३, कोणार्कनगर) असे आहे़
मयत आबासाहेब माळोदे हे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते़ सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराला लागून असलेल्या किराणा दुकानात त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले़या घटनेची माहिती माळोदे कुटुंबीयांनी आडगाव पोलिसांना कळविताच ते घटनास्थळी दाखल झाले़ माळोदे यांच्या पश्चात, आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार असून, सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्त्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)