दुचाकीच्या धडकेत मुख्याध्यापक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST2018-04-27T00:13:34+5:302018-04-27T00:13:34+5:30

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीने पायी जाणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुकदेव दामोधर पाटील (६२) यांचा मृत्यू झाला.

A headmaster was killed in a wheelchair | दुचाकीच्या धडकेत मुख्याध्यापक ठार

दुचाकीच्या धडकेत मुख्याध्यापक ठार

ठळक मुद्देबुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवलीकाही दिवसांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरू

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीने पायी जाणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुकदेव दामोधर पाटील (६२) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सदर अपघात झाला. मंगळवारी सायंकाळी पाटील हे नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेले होते. सिन्नर-शिर्डी रस्त्याने जाणाºया दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील हे मनेगाव येथे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत सिन्नर, वडांगळी, दिंडोरी, सोनांबे, नांदगाव येथे काम केले. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघातांची मालिका सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: A headmaster was killed in a wheelchair

टॅग्स :Accidentअपघात