कर्ज वसुली शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:43 IST2019-04-08T18:41:07+5:302019-04-08T18:43:20+5:30

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

The headache of the debt recovery farmers | कर्ज वसुली शेतकऱ्यांची डोकेदुखी

निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे यांना निवेदन देताना संदीप आवारे, रमेश बडवर, प्रमोद बडवर, प्रंशात कुलकर्णी, रामनाथ बडवर आदि.

ठळक मुद्देजिल्हा बँक सक्त कर्ज वसुली विरोधात प्रांत, तहसीलदारांना निवेदन

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
दुष्काळी भागात थकित कर्ज वसुलीसाठी सक्तीची कारवाई करु नये असे शासन निर्णय असताना या आदेशाला केराची टोपली दाखवत जिल्हा बँकेचे अधिकारी सक्तीची कर्ज वसुली करण्यात मग्न आहेत. विशेष म्हणजे या कर्ज वसुलीसाठी अगदी शेतकऱ्यांंना धमकावून थेट स्थावर मालमत्ता लिलाव करण्याचे नोटीसीत नमूद केल्याने दुष्काळी काळात कर्ज कसे भरायचे असा अवघड पेच शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.
निफाड तालुक्यात सन २००९, २०१०, २०१३, २०१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे शेतकºयांचे द्राक्षबागेसह ऊस, कांदा,गहु,हरभरा आदी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने या पिकाचे पंचनामे करत तुटपुंजी मदत दिली होती, मात्र त्यानंतर वाढते विजेचे भारनियमन आणि शेतीमालाचे कोसळते बाजारभाव यामुळे शेती पिकांवरचा खर्च वाढला, मात्र उत्पादन घटले. त्याचा थेट परिणाम म्हणून शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले शेतीसाठी काढलेले कर्ज थकत होत गेले.
चौकट....
महसूल मंडळातील सर्व गावे दुष्काळी घोषित करून तेथील शेतकरी विद्यार्थी यांना काही सवलती दिल्या आहेत माञ शासनाचे हे आदेश पायदळी तुडवत जिल्हा बँकेची कर्जाची धडक वसुली सुरू असल्याने यातील काही थकबाकीदार शेतकºयांचे रक्तदाब वाढणे तसेच ते शेतकरी दुर्धर रोगाने आजारी आहे अशा कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडणे असे प्रकार घडु लागेल आहेत. त्यातच जिल्हा बँकेचे जे बडे थकबाकीदार आहे.
त्यांच्याकडील वसुली प्रथम करणे गरजेचे असताना ज्यांच्याकडे लाख, दोन लाख रु पये कर्ज आहे, अशा शेतकºयांचे उंबरठे दररोज झजविले जात आहे. साहजिकच या कारवाईत अधिकाºयांकडून होणारा दुजाभाव दिसुन येते असून बँकेने राबविलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा. यासाठी शेतकºयांनी प्रांत, तहसीलदार, सहाय्यक निबंधक, पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले.
याप्रसंगी शिरवाडे उपसरपंच संदिप आवारे, रमेश बडवर, प्रमोद बडवर, विलास शिंदे, प्रशांत कुलकर्णी, कानळद सरपंच गणेश जाधव, रामनाथ बडवर, साहेबराव बडवर, सुरेश शेळके, प्रंशात कुलकर्णी, दत्तात्रय कुलथे, बाळु निलख आदी उपस्थित होते.

Web Title: The headache of the debt recovery farmers

टॅग्स :bankबँक