‘त्या’ मशिदीचा धोकेदायक भाग उतरविणार

By Admin | Updated: August 7, 2014 01:42 IST2014-08-07T01:17:27+5:302014-08-07T01:42:22+5:30

‘त्या’ मशिदीचा धोकेदायक भाग उतरविणार

'He will throw a dangerous part of the mosque' | ‘त्या’ मशिदीचा धोकेदायक भाग उतरविणार

‘त्या’ मशिदीचा धोकेदायक भाग उतरविणार

 : जुने नाशिक परिसरातील धोकेदायक काझीच्या गढीवरील पुरातन मशिदीची पडझड होऊन पश्चिमेच्या दिशेने असलेल्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे सदर भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खतीब-ए-शहर यांनी आज गढीला भेट देऊन मशिदीची पाहणी केली. धोकेदायक झालेला मशिदीचा भाग उतरविला जाणार असून, लवकरच आराखडा तयार करून मशिदीची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काझीच्या गढीवर सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची पुरातन मशीद असून, या मशिदीच्या मागील बाजूच्या भिंतीला मोठा तडा गेला आहे. मशिदीची पडझड झाल्याने सदर मशिदीची भिंत कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील रहिवाशांकडून ती उतरवून घेण्याची मागणी केली जात होती. यामुळे शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, सुन्नी मुस्लीम सिरत समितीचे पदाधिकारी हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आज सकाळी मशिदीची पाहणी केली. यावेळी खतीब व सय्यद यांनी तत्काळ मशिदीची संपूर्ण पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेत यावेळी सोबत असलेल्या ठेकेदाराला मशिदीचा पडायला आलेल्या धोक ादायक भिंतीचा भाग काळजीपूर्वक उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)

Web Title: 'He will throw a dangerous part of the mosque'