शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

‘तो’ अर्धवट जळालेला मृतदेह नाशिकच्या युवकाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 02:00 IST

घोटी  : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाजवळ दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्याचे नाव मुजाहिद ...

ठळक मुद्देपोलिसांच्या तपासाला यश : गुन्हेगारी जगतातील स्पर्धेने गोल्डीचा काटा काढल्याचा अंदाज..!

घोटी  : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाजवळ दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्याचे नाव मुजाहिद ऊर्फ गोल्डी अफजल खान (राहणार वडाळा, नाशिक) असल्याचे निष्पन्न झाले आहे. अतिशय क्रूरपणे तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्यानंतर धारगावजवळ वैतरणा धरण परिसरात निर्जन स्थळी त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

 

या प्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा घोटी पोलिसात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान घोटी पोलिसांपुढे उभे ठाकले होते. खून झालेली व्यक्ती व खून करणाऱ्यांना शोधण्याचे मोठे कठीण काम होते.

आढळलेली मृत व्यक्ती ही मुजाहिद ऊर्फ गोल्डी अफजल खान (२४) असून, नाशिकच्यागुन्हेगारी जगतातील आहे. अनेक दिवसांपासून विविध गुन्ह्यांत तो तडीपार होता. त्याचे वास्तव्य इगतपुरी तालुक्यातच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुन्हेगारी विश्वातील गोल्डीच्या विरोधी गटाने त्याचा काटा काढल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे. या खून प्रकरणात ४ ते ५ जणांचा सहभाग असल्याचा अंदाज असून, संबंधितांचा कसून शोध सुरू आहे.

गोल्डीचा खून करून त्याचा मृतदेह वैतरणा धरणाजवळ आणला की, या परिसरातच हा खून केला, याबद्दल अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागला नाही. घोटी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली असून, २ दिवसांत खून झालेल्या व्यक्तीचा तपास लागला आहे. लवकरच खून करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

या प्रकरणी घोटीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे पथक अधिक तपास करीत आहे.

 

इन्फो

गोल्डी होता तडीपार गुंड

नाशिक येथील सराईत गुन्हेगार मुजाहिद ऊर्फ गोल्डी अफजल खान हा तडीपार होता. त्याचे गुन्हेगारी टोळीशी जवळचे संबंध होते. विविध गुन्हेही त्याच्या नावावर नोंदलेले आहेत.

विरोधी टोळीने बदला घेण्याच्या इराद्याने हा खून केला का? याचा शोध घेण्यात येत आहे.

----///////-

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी