खडकाळ जमिनीच्या सुपिकतेसाठी ‘त्याने’ शोधला उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:16+5:302021-05-08T04:14:16+5:30
खडकाळ जमिनीतील दगडांमुळे परिसरात शेती करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. हे दगड कमी करण्यासाठी मशीन असल्याचे ईश्वरला समजले आणि ...

खडकाळ जमिनीच्या सुपिकतेसाठी ‘त्याने’ शोधला उपाय
खडकाळ जमिनीतील दगडांमुळे परिसरात शेती करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. हे दगड कमी करण्यासाठी मशीन असल्याचे ईश्वरला समजले आणि त्याने त्याचा शोध सुरू केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला या मशीनचा पत्ता लागला, परंतु हे मशीन होते थेट मध्य प्रदेशात. या पठ्ठयाने मध्य प्रदेश गाठले आणि स्टोन कीपर हे मशीन सहा लाख रुपयांचा सौदा करत गावात आणले. या मशीनच्या ट्रान्सपाेर्टचा खर्च मोठा होता. त्यावरही ईश्वरने उपाय शोधला आणि आपले स्वत:चे ट्रॅक्टर मध्य प्रदेशात नेत तेथून त्याला जाेडून मशीन गावी आणले. आता या मशीनला गावात मोठी मागणी वाढू लागली असून, शेतातील दगड कमी होत असल्याने पीकपेराही चांगला येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
कोट.....
ईश्वरची कल्पना ही वेगळीच वाटली, परंतु त्या कल्पनेला मार्ग मिळत गेला आणि हे मशीन प्रत्यक्षात समोर दिसले. जमिनीतील दगड कमी झाल्याने सुपिकता वाढवून शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदाच होईल.
- पोपटराव महाडिक, शेतकरी, लक्ष्मीनगर
फोटो - ०७ लक्ष्मीनगर फार्मर
स्टोन कीपर मशीनने शेतातील दगड जमा करताना ईश्वर सोनवणे.
===Photopath===
070521\07nsk_16_07052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०७ लक्ष्मीनगर फार्मर स्टोन किपर मशीनने शेतातील दगड जमा करतांना ईश्वर सोनवणे.