शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

जानोरीतील पुरातन श्री दत्त मूर्तीच्या सौंदर्यात ‘त्यांनी’ घातली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:08 IST

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील भवानीपेठेत कुमार वयातील शिल्प प्रतिमा असलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या श्री दत्त मूर्तीची होणारी झीज आणि मूर्तीला आलेले मालिन्य दूर करत, विशिष्ट अशी रासायनिक प्रक्रिया करून तिचे जतन करण्यात आले आहे. रासायनिक प्रक्रियेद्वारे मूर्तीला नवीनतम रूप बहाल करण्याचे हे अवघड शिवधनुष्य नाशिकच्या मिट्टी फाउंडेशनचे संस्थापक व मूर्तिकार मयूर मोरे यांनी पेलले आहे.

ठळक मुद्देजागृत देवस्थान : मूर्तिकार मोरे यांच्या मिट्टी फाउंडेशनने पेलले आव्हान

जानोरी गावातील भवानी पेठ येथील कुलकर्णी वाड्यामध्ये जागृत असे श्री दत्त मंदिर आहे. १९२० मध्ये या मंदिराच्या उभारणीला सुरुवात होऊन १० डिसेंबर, १९२१ मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. तशी लिखित नोंद मंदिराच्या भिंतीवर त्याची साक्ष देते. श्री दत्त मूर्ती शंभर वर्षांपूर्वीची असल्याने तिला मालिन्य आले होते व मूर्तीची सूक्ष्म स्वरूपात होत असलेली झीज थांबविण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान मिट्टी फाउंडेशनचे संस्थापक व कला संवर्धन तज्ज्ञ मयूर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले. त्यांनी रासायनिक संवर्धन प्रक्रिया करून मूर्तीत नवचैतन्य आणले. मूर्तीचा बांधा आणि हात व पाय नाजूक असल्याने बऱ्याच अडचणी येत होत्या, परंतु हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्याचा मोरे यांनी संकल्प केला आणि तो तडीस नेला. मूर्तीची मालिन्यता दूर करण्यासाठी पारंपरिक पद्धतीसह रासायनिक संवर्धन प्रक्रिया करून त्यावर ह्यरिव्हरसेबलह्ण प्रकाराने मूर्तीवरील दागिन्यांना २४ कॅरेटचे गोल्ड फॉयलिंग व रंगकाम करून सौंदर्यीकरण करण्यात आले. एकूण १३ दिवस अथक प्रयत्न करत, हे आव्हानात्मक काम मोरे व कुटुंबीयांनी पूर्ण केले. या कामी त्यांना शिल्पकार श्रेयस गर्गे यांचे मार्गदर्शन लाभले. अत्यंत जागृत अशी ख्याती असलेल्या या श्री दत्त मंदिराची देखभाल गोविंद कुलकर्णी , नीलेश कुलकर्णी, तसेच ॲड.संतोष कुलकर्णी यांच्यासह सर्व कुटुंबीय हे मनोभावे करत आहेत.कुमार वयातील शिल्प प्रतिमामूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही श्रीगुरुदत्तात्रेय यांच्या कुमार वयातील शिल्प प्रतिमा आहे असून, भिक्षेसाठी झोळी नसलेली व हातामध्ये रुद्राक्ष माळ धारण केलेली ही मनोहारी मूर्ती आहे. मंदिरात विशेष करून दत्तजयंती, श्री गुरुपौर्णिमा यासह अन्य सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. राज्यातील इतर भागाप्रमाणे येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी वार्षिक बोहोड्याचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.राष्ट्रीय पातळीवर पुरातत्त्व संस्कृती संवर्धन या विषयावर इन्टॅक्ट ही संस्था प्रभावीपणे कार्य करते आहे. मिट्टी फाउंडेशन ही या संस्थेसोबत कार्यरत असल्याने येणाऱ्या काळात या विषयावर भरीव कामगिरी करण्याचा मानस आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक प्राचीन धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेले मूर्ती व मंदिराचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.- मयूर मोरे, शिल्पकार

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक