हट्टीपाडा महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:53 IST2018-03-13T01:53:26+5:302018-03-13T01:53:26+5:30
तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया हट्टीपाडा गावात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, टंचाईने वैतागलेल्या महिलांनी थेट पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढत तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

हट्टीपाडा महिलांचा हंडा मोर्चा
पेठ : तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया हट्टीपाडा गावात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, टंचाईने वैतागलेल्या महिलांनी थेट पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढत तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीने सुरळीत सुविधा उपलब्ध करून न दिल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, ग्रामपंचायत प्रशासन दाद देत नसल्याने पंचायत समितीने याबाबत लक्ष घालून पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा गावातील महिला पंचायत समितीसमोर आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर गावातील महिलांच्या स्वाक्षºया आहेत.