हिरावाडीत तरुणावर हत्त्याराने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 15:44 IST2017-07-25T15:44:08+5:302017-07-25T15:44:08+5:30
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडण

हिरावाडीत तरुणावर हत्त्याराने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका युवकावर दोघांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना हिरावाडीत रविवारी (दि़२३) रात्रीच्या सुमारास घडली़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक पवार (रा़नारायणबापू नगर, नाशिकरोड) याने आपल मोबाईल विकण्यासाठी आॅनलाईन ओएलएक्सवर जाहिरात दिली होती़ या जाहिरातीबाबत मित्र रोहित गरड व जय तेंडुलकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी पवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हिरावाडीतील आर के बेकरीजवळ गेला होता़ या ठिकाणी गरडचे व एका विधीसंघर्षित मुलामध्ये किरकोळ स्वरुपाचे भांडण झाले असता संशयित सोनू संजय ससाणे (२०, हिरावाडी पंचवटी) व विधीसंघर्षित बालकाने विवेक पवार याच्यावर धारदार शस्त्राने वार केले़ यामध्ये जखमी झालेल्या पवारला उपाचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़
या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित सोनू ससाणे यास अटक तर विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे़