शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:01 AM

गोरख घुसळे । पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा ...

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात थंडीचा कडाका : रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती

गोरख घुसळे ।पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पूर्णत: हतबल झाले आहे. सकाळी पडणाऱ्या या नयनरम्य धुक्यामुळे पिकांची वाट लागली असून, उत्पादनात घट येण्याची धास्ती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात आला असून, त्याची चिंता वाढली आहे.पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, विखरणी, कातरणी, पिंपरी, धुळगाव, साबरवाडी, खैरगव्हाण, सावरगाव, सोमठाण देश, निलखेडे, आंबेगाव, शिरसगाव लौकी, वळदगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके व दव पहावयास मिळाले. आज दुपारपर्यंत धुक्यामुळे जवळील काही अंतरावरदेखील दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शेतकरी पिकांवर महागडी औषधे फवारत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, मात्र आता तो पूर्णपणे हतबल झाला असून, पिकांवर किती वेळा महागड्या औषधांची फवारणी करायची, असा सवाल करत आहे.ढगाळ वातावरणामुळे पिके खराब झाल्याने उत्पादनात घटयावर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, कांदा ही सर्व पिके पावसामुळे सडून गेल्याने खराब झाली. शेतकऱ्यांच्या हाती दमडीही आली नाही. खरिपासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला, असे असतानाही शेतकºयांनी खरीप हंगामाची लागवड केली.४गेल्या दोन महिन्यापासून असलेले ढगाळ हवामान, पाऊस, दाट धुके व दवामुळे रब्बी हंगामातील, कांदा व कांदारोप, हरभरा व भाजीपाला पिके खराब झाल्याने उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.पाटोदा आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड धुके पडत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात धुके व दव पडले आहे. या धुके व दवामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्ष व डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागेवर डावणी तसेच कांद्यावर करपा रोगाचे प्रमाण वाढले आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्यात जमा आहे.- नंदकुमार मेंगाणे, शेतकरी, पाटोदाधुके, दवामुळे कांदा सडला४सध्या बाजारात कांद्यास चांगला भाव मिळत आहे. व अजूनही काही दिवस कांद्यास असेच बाजारभाव मिळण्याची शेतकºयांना खात्री आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सकाळी पडणाºया या दव व धुक्यामुळे कांदा व कांदारोपांच्या पातीवर दव साचत असून, या दवाचा निचरा होऊन कांद्याच्या बुडाला पोहचत असल्याने कांदा हा जमिनीतच सडत आहे. परिसरातील हजारो हेक्टरवरील कांदा यामुळे खराब होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती