खामखेडा परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:12 IST2018-04-06T00:12:21+5:302018-04-06T00:12:21+5:30

खामखेडा: खामखेडा परिसरात गहू कापणी व काढणीसाठी पंजाब प्रांतातील हार्वेस्टर दाखल झाले आहे.

Harvester for wheat harvesting in Khamkhheda area | खामखेडा परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर दाखल

खामखेडा परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर दाखल

ठळक मुद्देकांदा कवडीमोल भावाने विकावा लागलागव्हाच्या खुटाराचा उपयोग जनावरांना चारा म्हणून

खामखेडा: खामखेडा परिसरात गहू कापणी व काढणीसाठी पंजाब प्रांतातील हार्वेस्टर दाखल झाले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी उन्हाळी कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळाल्याने शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची पिकांची लागवड केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी गव्हाची लागवड कमी प्रमाणात केल्याने गव्हाच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे शेतकºयाला बाजारातून महागडा विकत गहू खावा लागल्या होता. परंतु गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आल्याने कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाला नाही . चालू वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना चांगले पाणी असल्याने शेतकºयाने कांद्याबरोबर गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. तसेच या परिसरातील डाळिंब बागा तेल्या रोगाने उद्ध्वस्त झाल्याने डाळिंबाच्या क्षेत्रात गव्हाची पेरणी करावी लागल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पूर्वी अल्प बागायती शेती असल्याने शेतीच्या कामासाठी सहज मजूर उपलब्ध होत असे. त्यावेळेस खळे पद्धत असल्याने गव्हाची कापणी केल्यानंतर तो मळणी करून काढला जात असे. कारण गव्हाची मळणी करून काढल्यावर गव्हाच्या खुटाराचा उपयोग जनावरांना चारा म्हणून केला जात असे; परंतु आता आधुनिक युगामघ्ये शेती ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागल्याने शेतकºयांकडील बैलाची संख्या कमी झाली आहे. मध्यंतरी गहू काढणीसाठी विजेवर व ट्रॅक्टरवर चालणाºया यंत्रावर काढण्यात येत होती; परंतु आता बागायती शेतीत वाढ झाल्याने शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नाही. आता शेतातच हार्वेस्टरच्या साहाय्याने गव्हाची काढणी केली जाते. त्यामुळे अगदी काही तासांमध्ये शेतातच काढणी केली जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला अधिक पसंती देत आहेत. कारण यामुळे वेळेची बचत होते; परंतु गहू काढणी झाल्यानंतर गव्हाच्या भुशाचे शेतात खत तयार होते.

Web Title: Harvester for wheat harvesting in Khamkhheda area

टॅग्स :Farmerशेतकरी