हार्वेस्टरचालकांचा वधारलाय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:02 IST2020-04-14T23:17:51+5:302020-04-15T00:02:32+5:30
लॉकडाउनचा फायदा घेत ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचालकांना चांगलाच भाव वधारला असून, आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हार्वेस्टरचालकांचा वधारलाय भाव
कवडदरा : लॉकडाउनचा फायदा घेत ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचालकांना चांगलाच भाव वधारला असून, आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीची कामे सुरू झाली आहेत. गहू सोंगणीची कामे जोरात सुरू आहेत. परंतु या लॉकडाउन काळात शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. त्याचप्रमाणे परराज्यातून दरवर्षाप्रमाणे येणारे हार्वेस्टर मशीन यावर्षी आले नसल्याने, स्थानिक हार्वेस्टरचालकांनी अचानक याचा फायदा घेत गहू काढण्यासाठी प्रत्येक एकराचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे मुळातच आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना हार्वेस्टर मालकांनी भाव वाढवल्यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे. यापूर्वी शेतीची कामे बंद होती; परंतु सरकारने शेतीच्या कामाला लॉकडाउन काळात सवलत दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतातील पिके सोंगणीच्या कामांनी सध्या जोर पकडला आहे. शेतातील उत्पादित धान्य, कांदा, फुले, फळे, बहुतांशी भाजीपाला व इतर शेतीत उत्पादन होणाºया वस्तू, मार्केट बंद असल्यामुळे बाजारात नेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांची आर्थिक कमाई सध्या बंद आहे. परंतु आता शासनाने शेतीच्या कामांना लॉकडाउनमधून वगळण्यात आल्यामुळे, आता शेतकरी शेतकामावर जोर देत आहे.
गहू सोंगणीला आल्यामुळे व तो लवकर काढणे गरजेचे असल्यामुळे मात्र नेहमीप्रमाणे लॉकडाउन काळात शेतमजूर मिळत नसल्याने नाइलाजाने हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढला जात आहे. मात्र त्यामुळे या हार्वेस्टरवाल्यांना मोठा भाव आला आहे. त्यांनी या पंधरा-वीस दिवसातच प्रतिएकर पाचशे, सहाशे रुपये भाव अधिक वाढवला आहे. पूर्वी गहू काढण्यासाठी प्रतिएकर पंधराशे ते सोळाशे असा भाव होता; परंतु आता हाच प्रतिएकर भाव दोन हजार रुपये व त्यापुढे गेला आहे. शिवाय हार्वेस्टरवाल्यांना अनेकदा सांगूनही लवकर ते येत नाहीत. आता या हार्वेस्टरवाल्यांकडे नंबर लावण्याची वेळ शेतकºयांना आली आहे. एकप्रकारे अडवणूक होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.