हिरावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:17 AM2019-05-19T00:17:29+5:302019-05-19T00:18:24+5:30

रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ‘गाडी हळू चालवा...’ असे सांगितल्याचा राग आल्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी कमलनगर परिसरात शुक्रवारी (दि.१७) घडली.

Hariwadi succumbed to minor cause | हिरावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण

हिरावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण

Next

पंचवटी : रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ‘गाडी हळू चालवा...’ असे सांगितल्याचा राग आल्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी कमलनगर परिसरात शुक्रवारी (दि.१७) घडली. याबाबत मारहाण करणाºया अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हिरावाडी म्हाडा कॉलनी येथे राहणाºया वैभव भाऊराव खांडेकर यांनी पंचवटी पोलिसांत तक्र ार दाखल केली आहे.
म्हाडा पोलीस वसाहतीत राहणारे खांडेकर हे लहान मुलाला कमलनगर येथील कृष्ण गार्डनसमोर असलेल्या रस्त्यावरून जात असताना शिवकृपानगरकडून भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या पल्सरवरील चालकाला गाडी हळू चालव, असे सांगतात. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे.

Web Title: Hariwadi succumbed to minor cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.