Hariom in the market at the moment of Dussehra | दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत पुनश्च हरिओम

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत पुनश्च हरिओम

ठळक मुद्दे ग्राहकांची वर्दळ वाढल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला

दिंडोरी : गेल्या सहा सात महिन्यापासून शांत असलेल्या बाजारपेठेत दसऱ्याच्या मुहूर्तावर काहीशी उभारी मिळाली असून बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉक डाऊन होत पुढे त्यात टप्प्याटप्प्याने शिथिलता आली, मात्र बाजारपेठेत उलाढाल कमी होत होती. गेल्या सहा सात महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले होते. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची वर्दळ वाढल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
गेली काही दिवस ठप्प असलेल्या वाहन उद्योगाला संजीवनी मिळाली असून दुचाकी चारचाकी शोरूम मध्ये ग्राहकांची वर्दळ वाढत वाहन विक्री सुरू झाली आहे मोबाईल दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी दिसून आली कपडे व सोन्याचे दुकानातही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.कोरोनाच्या पर्शवभूमीवर ग्राहक मास्क सॅनिटायझर चा वापर करताना दिसत असून प्रशासनाने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

Web Title: Hariom in the market at the moment of Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.