हरिभाऊ बागडे : रासाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ साखर उताºयावर भाव द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:15 IST2018-02-07T00:14:42+5:302018-02-07T00:15:11+5:30
लासलगाव : साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शासनाने साखर उताºयावर भाव देण्याचे धोरण राबवावे तरच शेतकरी व कारखानदारी टिकेल. फॅटवर दुधाचा दर ठरविला तसे धोरण साखर उत्पादनासाठी राबवावे.

हरिभाऊ बागडे : रासाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ साखर उताºयावर भाव द्यावा
लासलगाव : साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शासनाने साखर उताºयावर भाव देण्याचे धोरण राबवावे तरच शेतकरी व कारखानदारी टिकेल. फॅटवर दुधाचा दर ठरविला तसे धोरण साखर उत्पादनासाठी राबवावे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रासाका कार्यस्थळावरील गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी केले. कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ महामंडलेश्वर १००८ श्री श्री शांतिगिरी महाराज, १००८ श्री श्री महामंडलेश्वर महंत गणेशानंद महाराज, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते व रासाकाचे संस्थापक बाळासाहेब वाघ, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समिती सभापती पंडित अहेर, शेतकरी संघटनेचे सोमनाथ बोराडे, लासलगाव कृउबाचे सभापती जयदत्त होळकर, राजाराम पानगव्हाणे यांच्या उपस्थित उसाची मोळी टाकून करण्यात आला. गोपाल आरगडे यांनी प्रास्ताविक केले.
बागडे पुढे म्हणाले की, साखर कारखानदारी व कोणत्याही संस्थेचा विकास साधायचा असेल तर मन लावून काम केले पाहिजे. जोपर्यंत रासाकाची जबाबदारी आहे ती आपण नेटाने निभावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी राजेंद्र डोखळे, तानाजी बनकर, राजेंद्र मोगल, अॅड. विलास आंधळे, सिद्धार्थ वनारसे, पंढरीनाथ थोरे, यतिन कदम, सुभाष कराड, गुरुदेव कांदे, विजय कारे, शिवाजी डेपले, निफाडचे तहसीलदार आवळकंडे, पिंपळगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, संचालक जितेंद्र सोनिसस, शीला
आरखडे, सचिन कहारे, दिगंबर बडदे, आर. आर. वाघ, पी. आर. जाधव, बळवंत जाधव, नेताजी वाघ,
विलास वाघ, सुरेश वाढवणे, अशोक अहेर, राजाराम भोसले आदी उपस्थित होते.