शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

मदतीसाठी सरसावले ‘युवा मित्र’चे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 10:07 PM

आठवड्यापासून घरातील किराणा संपलेला, पैसा संपलेला त्यामुळे पोटाची खळगी भरायची तरी कशी? या विवंचनेत असणाºया तालुक्यातील गरीब व मजुरीवर पोट असणाºया मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, विदर्भासह आदी भागातील स्थलांतरित कुटुंबीयांसाठी ‘युवा मित्र’ने पुढाकार घेतला आहे. १५ ते २० दिवस पुरेल इतका किराणा भेट देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून देत आहे.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : कामगारांसह हातावर पोट असणाऱ्यांना आधार

सिन्नर : गेल्या आठवड्यापासून घरातील किराणा संपलेला, पैसा संपलेला त्यामुळे पोटाची खळगी भरायची तरी कशी? या विवंचनेत असणाºया तालुक्यातील गरीब व मजुरीवर पोट असणाºया मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, विदर्भासह आदी भागातील स्थलांतरित कुटुंबीयांसाठी ‘युवा मित्र’ने पुढाकार घेतला आहे. १५ ते २० दिवस पुरेल इतका किराणा भेट देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून देत आहे.दररोज मजुरीसाठी कामाला जायचे. मिळालेल्या मजुरीतूनच रात्री चूल पेटवायची, मात्र लॉकडाउनमुळे घरातील किराणा संपलेला, काम नसल्याने पैसा संपलेला. असे असूनही काही खरेदीसाठी जावे तर पोलीस मारतील याचा धाक. ही बाब ‘युवा मित्र’चे संस्थापक व कार्यकारी संचालक सुनील पोटे यांनी हेरली व यासाठी मदतनिधी देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व इतर दानशूर व्यक्तींना केले. यावर अनेकजणांनी प्रत्येकी १५०० रु पयांची मदत देऊन या समाजकार्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर शासनाच्या आरोग्यविषयक सूचनांचे तंतोतंत पालन करून तालुक्यातील अनेक भागातील कामगार, बांधकाम व्यावसायातील मजूर व गोरगरिबांना किराणा देऊन त्यांचे जीवनसुकर करण्याचे काम संस्थेने केले आहे.काही दिवसांपूर्वी माळेगाव औद्योगिक वसाहतीत अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील कामगारांच्या २१ कुटुंबांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सोशल माध्यमावर व्हायरल झाले. यानंतर युवा मित्रने या कुटुंबीयांचा शोध घेत त्यांनाही किराणा सुपुर्द केला.अनेक कुटुंबांचा शोध घेऊन त्यांनाही किराणा पोहचिवण्याचा उपक्र म ‘युवा मित्र’कडून सुरू आहे. याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, स्टईसचे व्यवस्थापक कमालकर पोटे, विलास, नाठे, रतन माली, संताजी जगताप, माळेगावचे तलाठी राहुल देशमुख, वावीचे सरपंच सतीश भुतडा आदी उपस्थित होते.कुंदेवाडी फाट्यावर भीक मागून जगणाºया जालना जिल्ह्यातील २५ कुटुंबे, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करणारे १२ कुटुंबे, तसेच खापराळे येथील २ कुटुंबे, गोजरे मळा परिसरातील १२ कुटुंबे, सिन्नर न्यायालय परिसरातील २ कुटुंबे, लोणारवाडी येथील १ कुटुंब असे शंभरहून अधिक कुटुंबांना तीन दिवसांत भरीव मदत या मंडळातर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न