दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:55 IST2019-07-23T23:55:23+5:302019-07-23T23:55:39+5:30
समाधानकारक पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या परिस्थितीमुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात
सिडको : समाधानकारक पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या परिस्थितीमुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. अवजड वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष इंद्रजित सिंग, महासचिव इंद्रपाल सिंग मारवा, नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या हस्ते शेतक ºयांना एक लाखाचा धनादेश देण्यात आला. अवजड वाहतूक सेनेच्या नाशिक शाखेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पांगरे यांच्या सहकार्याने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, याचाच एक भाग म्हणून शेतकºयांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. सिडकोतील राणाप्रताप चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली. कार्यक्रमास अवजड वाहतूक सेनेचे लक्ष्मण पाटील, मनोज उदावंत तसेच युवासेना महानगरप्रमुख शंकर पांगरे, अश्विन जामदार, सुमित चोपडे, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.