बँकेचा पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:28+5:302021-07-22T04:10:28+5:30

केवायसीकरिता आलेला फोन हा संपूर्णत: फसवा असून ऑनलाइन आर्थिक लुटीचे याद्वारे जाळे टाकले जात असल्याचे लक्षात घेऊन असे ‘डमी ...

Handle bank money; Fraud can happen under the name of KYC! | बँकेचा पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!

बँकेचा पैसा सांभाळा; केवायसीच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक!

केवायसीकरिता आलेला फोन हा संपूर्णत: फसवा असून ऑनलाइन आर्थिक लुटीचे याद्वारे जाळे टाकले जात असल्याचे लक्षात घेऊन असे ‘डमी कॉल’ त्वरित कट करावेत. याबाबत कुठल्याही प्रकारचा संवाद साधण्याचा किंवा त्या व्यक्तीला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडूनही करण्यात आले आहे.

-----

--अशी होऊ शकते फसवणूक---

प्रकरण-१

मला मोबाईलवरून कॉल आला आणि समोरील व्यक्तीने मला हिंदी भाषेतून बँक अकाउंट बंद होईल, केवायसीकरिता माहिती सांगा, असे म्हटले. त्यानंतर मी त्याला माझे नाव, आधार कार्ड क्रमांक, डेबिट कार्डावरील पंधरा अंकी क्रमांक, खाते क्रमांक आयईएफसी कोड, एमआयसीआर कोड आदी माहिती सांगितली. यानंतर काही वेळेतच माझ्या मोबाइलवर बँकेच्या खात्यातून रक्कम ऑनलाइन काढली गेल्याचा लघुसंदेश मिळाला.

---प्रकरण-२

माझ्या मोबाइलवर एक मेसेज आला की तुमचे केवायसी अपडेट करावयाचे आहे. खालील लिंकवर जाऊन आपली योग्य ती आवश्यक माहिती भरा, असे त्यामध्ये लिहिलेले होते. यामुळे लिंकवर क्लिक केले आणि बँक, खाते क्रमांक, डेबिट कार्डाची माहिती, आधार कार्ड क्रमांक, चारअंकी गोपनीय क्रमांक आदी रिकाम्या रकान्यात भरून सबमिटच्या बटनवर क्लिक केले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच बँक खात्यातून दोनदा १० हजार याप्रमाणे २० हजारांची रक्कम गायब झाली.

--प्रकरण-३

ई-मेलच्या इनबॉक्समध्ये एक ई-मेल थेट बँकेच्या नावाने प्राप्त झाला. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसणे साहजिकच होते. ई-मेल वाचला असता त्यामध्ये केवायसीकरिता तत्काळ दिलेल्या लिंकवर भेट देण्याची सूचना होती. लिंकवर क्लिक केले असता एक नमुना अर्ज ओपन झाला. यानंतर त्या नमुन्यात सर्व माहिती भरल्यानंतर मला मोबाइल क्रमांकावर फोन येतो आणि तुमची सगळी माहिती ई-मेलद्वारे मिळाल्याचे सांगून बँकेचे अधिकारी बोलत असल्याचे भासवून त्याने ‘फोन पे’वरून रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून मागितली आणि फसवणूक झाली.

---इन्फो---

गेलेले पैसे परत मिळणे कठीण

ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर गेलेले पैसे परत मिळण्याची शाश्वती जवळजवळ नसतेच. कारण सायबर गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून रकमेची वसुली करणे हे पोलिसांसमोरही मोठे आव्हान असते. सायबर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी अजूनही फारसे प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रणा पोलिसांकडे उपलब्ध झालेली नाही. सायबर गुन्हेगार हे परराज्यांत बसून ग्राहकांची फसवणूक करतात.

---

210721\21nsk_10_21072021_13.jpg

बँकेचा पैसा सांभाळा

Web Title: Handle bank money; Fraud can happen under the name of KYC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.