महापालिकेच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्र मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:20 AM2019-04-23T00:20:59+5:302019-04-23T00:21:33+5:30

भारतनगरमधील सुमारे दहा एकर महापालिकेची मालिकेची जागेवरील अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण महापालिकेचे अतिक्र मण निर्मूलन विभाग केव्हा काढणार आहे. तसेच मनपाची मालकीची जागा मोकळा श्वास केव्हा घेणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

 Handicapped encroachment on Municipal premises | महापालिकेच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्र मण

महापालिकेच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्र मण

Next

इंदिरानगर : भारतनगरमधील सुमारे दहा एकर महापालिकेची मालिकेची जागेवरील अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण महापालिकेचे अतिक्र मण निर्मूलन विभाग केव्हा काढणार आहे. तसेच मनपाची मालकीची जागा मोकळा श्वास केव्हा घेणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात विविध ठिकाणी धार्मिक स्थळे हटवण्यात आली, त्यानंतर वडाळागावातील गावातील सावित्रीबाई झोपट्टीतील सुमारे चारशे अनधिकृत झोपड्या हटवण्याची कारवाई करण्यात आली. आता भारतनगरमधील महापालिकेच्या भूखंडावर असलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण केव्हा काढणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. महापालिकेने आरक्षित करून खरेदी केलेल्या भूखंडाचे जुने जमीनमालक आणि दलालांनी मनपाचे भूखंड गुंठे वार पद्धतीने विक्र ी केल्याचे उघडीस येऊ अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने उलट सुलट चर्चा होत आहे. भारत नगरच्या या भूखंडावर इ.स. १९६९ साला पूर्वीपासून दोन कुटुंबाची सुमारे शंभर जणांची सातबारा उतारावर नावे होती. यामुळे विक्र ी करण्यास अडचण निर्माण होत असे इ.स.१९७० महापालिकेने सदर जागेवर गुरांचा गोठा शंभर फुटी डीपी रस्ता व बेघरांसाठी घरी अशा तीन योजनांसाठी आरक्षण टाकली होते. सुमारे वीस वर्षांपासून संबंधित मालक व काही दलांनी संगमत करून एक एक करून सुमारे दोन लाख ते तीन लाख रु पये गुंठ्याने फक्त नोटरी करून जागा विकण्याचा धडका सुरू केला होता. आरक्षणासाठी जमीनमालकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनपा इ.स.१९८९ पासून थोडे थोडे करून इ.स. २०१० मध्ये सुमारे सहा कोटी पन्नास लाख रु पये दिले. सुमारे दहा एकर जमीन मनपाच्या नावावर झाली आहे. सातबारा उतारावरही मनपाचे नाव लागले गेले.
सुमारे वीस वर्षांत काही दलालांनी एकेक करून संपूर्ण जमिनीवर सुमारे ७०० झोपड्या बसविल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रु पयांची नागरिकांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे महापालिकेचे वतीने न्यायालयाच्या निदर्शनानुसार विविध धार्मिक स्थळे हटविण्यात आली तसेच वडाळागावातील सुमारे चारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या, परंतु भारतनगरमधील महापालिकेची सुमारे दहा एकर जमीन वर ६०० अधिक अनेक अनधिकृत झोपड्या अद्यापही अतिक्र मण निर्मूलन मोहिमेने आठविल्या नाहीत त्यामुळे मनपाच्या सदर आरक्षित जागेवर योजना राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे.
सर्रासपणे मनपाच्या जागेची खरेदी-विक्र ी सुरूच
महापालिकेचे वतीने सदर जागा मनपाची असून, कोणी खरेदी-विक्र ी केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यातील, असा इशाराचा फलकही लावला आहे. अद्यापही दलालांचा सुळसुळाट असून, सर्रासपणे मनपाच्या जागेची खरेदी-विक्र ी सुरूच आहे काही राजकारण्यांचा या दलालांना वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेचे जागेवरच जर अतिक्र मण काढू शकत नाही तर दुसऱ्याचे अतिक्र मण काढण्याचा काय अधिकार, असा उपरोधिक प्रश्नही नागरिकांनी केला आहे. पुन्हा महापालिकेच्या वतीने अनेक धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे यादी घोषित करण्यात आली आहे, परंतु महापालिकेच्या जागेवरील अतिक्र मण केव्हा काढणार? असा प्रश्न नागरिक यांनी केला आहे.

Web Title:  Handicapped encroachment on Municipal premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.