‘टिप्पर’च्या एका गुंडाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST2021-05-18T04:16:18+5:302021-05-18T04:16:18+5:30

मागील आठवड्यात संशयित अंकुश सायखेडे व संदीप घुसळे या दोघांनी दारू पिऊन महिलेस व तिच्या मुलांना मारहाण, शिवीगाळ ...

Handcuffs to a tipper gangster | ‘टिप्पर’च्या एका गुंडाला ठोकल्या बेड्या

‘टिप्पर’च्या एका गुंडाला ठोकल्या बेड्या

मागील आठवड्यात संशयित अंकुश सायखेडे व संदीप घुसळे या दोघांनी दारू पिऊन महिलेस व तिच्या मुलांना मारहाण, शिवीगाळ व जीवे मारेल,अशी धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सिडकोसह परिसरात टिप्पर गँगचे गुंड कोणत्या ना कोणत्या कारणातून नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना घाबरून नागरिक पोलिसांत तक्रार देत नाहीत, ना त्यांच्या विरोधात बोलत. यामुळे या गुंडांचा त्रास सुरूच असतो. शुक्रवारी रात्री अंकुश सायखेडे व संदीप घुसळे यांनी दारू पिऊन महिलेच्या मुलांना शिवीगाळ केली. शनिवारी दुपारी या दोघांसह त्यांच्या इतर मित्रांनी महिलेच्या घरी जात पुन्हा महिलेच्या मुलांना व महिलेला मारहाण करीत त्यांचे कपडे फाडले. शिवीगाळ केली. जाताना बघून घेतो, असे म्हणत जीवे मारायची धमकी दिली. सदर महिलेने अंबड पोलिसात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी मात्र त्यांच्याऐवजी मुलाची किरकोळ तक्रार दाखल करून घेतली. अखेरीस पोलिसांनी यातील संशयित अंकुश सायखेडे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी सायखेडे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यातील दुसरा संशयित संदीप घुसले मात्र अद्यापही पोलिसांना तुरी देऊन फरार झाला आहे.

Web Title: Handcuffs to a tipper gangster