मांडुळ तस्कराला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:01+5:302021-02-05T05:39:01+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, तपोवन रस्त्यावर एका मॉलच्या जवळ सर्प तस्कर मांडुळ जातीचा सर्प घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त ...

मांडुळ तस्कराला ठोकल्या बेड्या
याबाबत अधिक माहिती अशी, तपोवन रस्त्यावर एका मॉलच्या जवळ सर्प तस्कर मांडुळ जातीचा सर्प घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश शिंदे यांना मिळाली. त्यांनी याबाबत तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना कळविले. त्यांच्या आदेशान्वये पथकाने या ठिकाणी सापळा रचला. संशयित सर्प तस्कर रमेश वसंत लकारे (२५, रा. इंदिरा घरकुल, करंजवन, ता. दिंडोरी) हा संशयास्पदरीत्या बॅग घेऊन आला. यावेळी पथकाने शिताफीने रमेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत स्वत:जवळ असलेल्या एका प्लास्टिकच्या गोणीची झडती घेण्यास नकार दिला. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडुळ जातीचा जिवंत साप आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या पथकाने पुढील कारवाईसाठी वन्यजीव तस्कर रमेश व त्याच्याजवळ आढळून आलेला साप नाशिक पश्चिम वनविभागाकडे सोपविला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.