दुसºया दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:32 IST2018-02-24T00:32:55+5:302018-02-24T00:32:55+5:30
येथील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेली अतिक्र मण मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. त्रिमूर्ती चौकासह परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.

दुसºया दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा
सिडको : येथील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेली अतिक्र मण मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. त्रिमूर्ती चौकासह परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यात काही ठिकाणी झालेले तुरळक वाद वगळता अतिक्र मण मोहीम शांततेत पार पडली. या मोहिमेत महानगरपालिकेने नुकसान केलेल्या काही वस्तूंबाबत नुकसानभरपाईची मागणी करण्यात येणार असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. त्रिमूर्ती चौक परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. त्यामुळे याठिकाणची अतिक्र मणे काढणे ही अत्यंत गरजेची बाब झाली होती. महानगरपालिकेने आज दुसºया दिवशी दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक व दत्त मंदिर परिसरातील रस्त्यालगत असलेली अतिक्र मणे काढली. यात हातगाडी, पानटपरी, कुल्फीची गाडी आदी जप्त करण्यात आल्या असून, सुमारे ३० अतिक्र मणे काढण्यात आली आहेत. यात दुकानांसमोर असलेले काही फलकही महानगरपालिकेने हटविले आहेत.
एका दुकानासमोर असलेला फलक हा परवानगी घेऊन लावण्यात आलेला असतानाही महानगरपालिकेने तो काढून टाकला. त्यावरही काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर या मोहिमेत मनपाने चुकीच्या पद्धतीने अतिक्र मण काढले असून, काही दुकानदारांचे नुकसान झाले असल्याचा आरोप करीत नुकसानभरपाईची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.