रिक्षा प्रवासात दीड लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 00:04 IST2016-01-13T23:00:07+5:302016-01-14T00:04:14+5:30
रिक्षा प्रवासात दीड लाखाचे दागिने लंपास

रिक्षा प्रवासात दीड लाखाचे दागिने लंपास
नाशिक : सोमवारी रात्रीच्या सुमारास रिक्षाने निमाणी ते द्वारकापर्यंतचा प्रवास करणाऱ्या वृद्ध व्यक्तीच्या बॅगेतील दीड लाख रुपये किमतीचे दागिने सहप्रवाशांनी लंपास केल्याची घटना घडली आहे़
सिन्नरच्या ठाणगावमधील दत्तात्रय किसन लांडगे (६७) हे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निमाणी बसस्थानकाहून द्वारकाकडे रिक्षाने जात होते़ त्यावेळी सहप्रवासी म्हणून बसलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या बॅगमधील एक लाख ५५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले़ या प्रकरणी लांडगे यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे़ (प्रतिनिधी)