दीड लाखाचा ऐवज लंपास
By Admin | Updated: July 21, 2015 00:38 IST2015-07-21T00:38:16+5:302015-07-21T00:38:16+5:30
दीड लाखाचा ऐवज लंपास

दीड लाखाचा ऐवज लंपास
नाशिक : जुने नाशिक परिसरातील रेणुकानगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मीना संजय दाणी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या फिर्यादीनुसार दाणी कुटुंबीय बाहेर गेले असता रविवारी रात्रीच्या दरम्यान रेणुकानगर येथील बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील सुमारे सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दुचाकींची चोरी
शहरात दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यात आडगाव परिसरातून घरासमोर लावलेली हीरो होंडा (एमएच१५ डीव्ही ९४५१) ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्याबद्दलचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सीटी सेंटर मॉलच्या बाहेर लावलेली दुचाकी (एमएच१५ सीएक्स ७५३०) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकाची आत्महत्त्या
दहीपूल येथील नेहरू चौकात राहणाऱ्या २३ वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली. संदीप अरविंद वडनेरे असे त्याचे नाव असून, औषध सेवन करण्यापूर्वी त्याने गळफास घेण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या आत्महत्त्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)