एचएएल कामगार संपावर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:30 IST2019-10-01T13:30:27+5:302019-10-01T13:30:38+5:30
ओझरटाऊनशिप : गेली ३४ महिने प्रलंबित वेतन कराराच्या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने १४ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

एचएएल कामगार संपावर जाणार
ओझरटाऊनशिप : गेली ३४ महिने प्रलंबित वेतन कराराच्या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने १४ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लढाऊ विमाननिर्मिती करणाऱ्या देशभरातील एकूण नऊ प्रभागातील जवळपास २० हजार कर्मचारी आपल्या वेतनवाढीसंदर्भात गेली कित्येक महिने आंदोलन करत आहे. अधिकारी वर्गाच्या तुलनेत अतिशय तुटपूंजी वाढ व्यवस्थापन देऊ करत असल्याचे मत को-आॅर्डिनेशन कमिटीच्या वतीने मांडण्यात आले. आस्थापनेप्रती कामगार प्रामाणिक असून जर कंपनी आर्थिक संकटात असेल तर अधिकारी वर्गाला दिलेली १-१-२०१७ पासून दिलेली वाढ बंद करावी आणि आर्थिक स्थिति उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगार वर्गाची सोबत वेतनवाढ करावी अशी मागणी कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. नाशिक कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक उच्च व्यवस्थापनासह, उपायुक्त श्रम नाशिक विभागीय श्रम आयुक्त मुंबई,यांना संपाची नोटिस देण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. (०१ ओझरटाऊनशिप)