भारतमातेच्या रक्षणासाठी एचएएल सज्ज; वायू दलास सेवा देण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:35 IST2020-06-21T03:24:43+5:302020-06-21T06:35:14+5:30
देशाच्या संरक्षण क्षेत्रात लष्कराला अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवून देण्यात एचएएलचा हातखंडा आहे.

भारतमातेच्या रक्षणासाठी एचएएल सज्ज; वायू दलास सेवा देण्याचा निर्धार
सुदर्शन सारडा
नाशिक : गलवान खोऱ्यातील वाद शिगेला पोहोचला असताना भारतीय संरक्षण क्षेत्रात लढाऊ विमान बनविण्यात अग्रणी असलेल्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सुद्धा भारताच्या संरक्षणासाठी मैदानात उतरली आहे. आम्ही सर्व स्तरावर लढण्यासाठी सज्ज असल्याचा निर्वाळा एचएएलच्या प्रमुखांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात लष्कराला अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवून देण्यात एचएएलचा हातखंडा आहे. भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव पाहता युद्धजन्य परिस्थितीत ‘सुखोई ३०’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान खरी ताकद सिद्ध करणार आहे. त्यामुळेच एच.ए.एल.ला देखील अप्रत्यक्षिरत्या हायअलर्टवर आल्याचे सांगितले जात आहे. देशभरात आज जितकी एअरफोर्स केंद्र आहेत तेथे असलेल्या लढाऊ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्याचे धोरण लवकरच अवलंबून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जाणार आहेत.
>एचएएलचे ब्रीद वाक्यच ‘द फोर्स बिहाइंड द फोर्सेस’ असे आहे. यापूर्वीही काही घटनांमध्ये आमची भूमिका नेहमी तत्पर राहत आलेली आहे. आम्ही युद्ध काळात देखील तयार आहोत. वेळ आल्यास आम्ही तसा आदेश काढणार आहोत. आम्ही दिलेल्या आॅर्डर वेळेत पूर्ण करणार आहोत. - व्ही. शेषिगरी राव,
मुख्य कार्यकारी अधिकारी, मिग कॉम्प्लेक्स, एचएएल.