एचएएल कारखाना राहणार चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 01:28 AM2021-04-21T01:28:53+5:302021-04-21T01:29:16+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने  वाढ होत असून, हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि  ही साखळी खंडित करण्यासाठी   बुधवार (दि.२१) ते शनिवार (दि.२४) असे चार दिवस  कारखाना बंद राहणार आहे. यापूर्वीही ११ ते १४ एप्रिल असे सलग चार दिवस कारखान्याचे कामकाज बंद होते.

The HAL factory will remain closed for four days | एचएएल कारखाना राहणार चार दिवस बंद

एचएएल कारखाना राहणार चार दिवस बंद

Next

ओझरटाऊनशिप : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने  वाढ होत असून, हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि  ही साखळी खंडित करण्यासाठी   बुधवार (दि.२१) ते शनिवार (दि.२४) असे चार दिवस  कारखाना बंद राहणार आहे. यापूर्वीही ११ ते १४ एप्रिल असे सलग चार दिवस कारखान्याचे कामकाज बंद होते.
कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे. ओझरसह परिसरात वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून ओझर व्यापारी असोसिएशनने आठ दिवस  जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. त्यास ओझरकर नागरिक प्रतिसाद देत आहेत.
कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही साखळी तोडण्याकरिता कामगार व व्यवस्थापनानेही निर्धार  केला आहे.  त्या पार्श्वभूमीवर २१ ते २४ एप्रिलपर्यंत  चार दिवस एचएएल कारखाना (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहणार आहे. या चार दिवसाच्या बंद काळातील कामकाज पुढे ज्या आठवड्यात शासकीय सुट्या येतील त्यावेळी  सुटीच्या कालावधीत वेगवेगळे  चार दिवस कारखाना सुरू ठेवून पूर्ण केले जाणार आहे,  असे एचएएल कामगार संघटनेने (नाशिक विभाग) कळविले आहे.
नाशिक शहरातील दोन्ही प्रेस गेले चार दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार होण्याची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा भाग आहे.

Web Title: The HAL factory will remain closed for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.