हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे सामने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:12+5:302021-02-05T05:46:12+5:30
नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे सर्व गटातील ...

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे सामने सुरू
नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे सर्व गटातील सामने पुन्हा सुरू झाले. पहिल्या दिवशीच्या सामन्यांमध्ये अक्षद धनवंतने दुहेरी शतक, ओम कोकणेने १९३, प्रसाद दिंडेने १७२, अमित मैदने ११३, तर यश खाडेने ११५ धावा ठोकून तर लालकृष्ण सोनवणेने पाच बळी घेत आपापल्या संघांसाठी योगदान दिले.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान - गोल्फ क्लब, महात्मानगर क्रिकेट मैदान व सय्यद पिंपरी क्रिकेट मैदान यासह यंदा नव्यानेच सुरू केलेल्या एसएसके क्रिकेट मैदान, शिंदे, सिन्नर येथेदेखील आयोजित करण्यात आले होते. अब्बासभाई मर्चंट व शब्बीरभाई मर्चंट यांचे आयोजनाचे कार्य अतिशय मोलाचे असून, सामने सुरू झाल्यामुळे नाशिकच्या क्रिकेट विश्वात चैतन्य परतले आहे.
नुकत्याच खेळल्या गेलेल्या सामन्यांचे संक्षिप्त धावफलक व निकाल पुढीलप्रमाणे आहेत.
१४ वर्षांखालील गट : एनडीसीए मॉर्निंग वि. नाशिक जिमखाना - एनडीसीए मॉर्निंग – सर्वबाद २९५ , प्रसाद दिंडे -१७२ वि. नाशिक जिमखाना – २९६/७ – यश पगार व हुजेफा शेख प्रत्येकी ८८- नाशिक जिमखाना ३ गडी राखून विजयी.
१६ वर्षांखालील गट : २२ यार्ड्स क्रिकेट क्लब वि. अर्जुन क्रिकेट अकादमी - २२ यार्ड्स क्रिकेट क्लब - ४४६ - अक्षद धनवंत २००, ओम कोकणे १९३ वि. अर्जुन क्रिकेट अकादमी-२७९ - वेदान्त पूरकर ८१, ओम इप्पर ८० - २२ यार्ड्स क्रिकेट क्लब १६७ धावांनी विजयी.
खुला गट : एकता क्रिकेट अकादमी ए.वि. कृष्णा क्रिकेट अकादमी- एकता क्रिकेट अकादमी ए- ३४३, अमित मैद ११३ वि. कृष्णा क्रिकेट अकादमी - सर्वबाद १२४, लालकृष्ण सोनवणे पाच बळी. एकता क्रिकेट अकादमी ए २१९ धावांनी विजयी.
नाशिक जिमखाना बी वि. कृष्णा क्रिकेट अकादमी - नाशिक जिमखाना बी - सर्वबाद ३३४ - यश खाडे ११५, मंगेश निरभवणे ५४. वि कृष्णा क्रिकेट अकादमी - ८ बाद २३६ - नाशिक जिमखाना बी ९८ धावांनी विजयी.