शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

हज यात्रेकरूंना दोन कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:55 IST

इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज-उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियामधील ही यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्समार्फत बुकिं ग केली आहे. फिर्यादीसह अन्य ९७ यात्रेकरूंची सुमारे २ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक या ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देसंशयित टूर्स संचालक विदेशात : आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

नाशिक : इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज-उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियामधील ही यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्समार्फत बुकिं ग केली आहे. फिर्यादीसह अन्य ९७ यात्रेकरूंची सुमारे २ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक या ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी केल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शकील गणी सय्यद (५२, रा. आडगाव) यांनी वडाळारोडवरील जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती. यामध्ये संपूर्ण राज्यातील लोकांचा समावेश आहे. टूर्सचे संचालक संशयित अब्दुल मतीन मनियार, समीर शमशुद्दीन मनियार, अजीज बनेमियॉँ मनियार, शाहरूख जुनेद मनियार, अमजद करीम मनियार, शकील बनेमियॉँ मनियार, मुस्तकीम गणी मनियार, अझहर अयाज मनियार, सोहील शेख यांनी आपापसांत संगनमताने कट कारस्थान रचून हज-उमराहच्या धार्मिक यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचे फिर्यादी शकील गणीभाई सय्यद यांनी तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्यातील ९७ नागरिकांनी पोलिसांकडे या घोटाळ्यात फसवणूक झाल्याप्रकरणी धाव घेतली आहे.२०१६ ते २०१८ या कालावधीत शहरात झालेला हा कोट्यवधींचा घोटाळा असून तक्रारदारांसह फसवणुकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबर महिन्यात पावणे दोन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात या संशयितांविरुद्ध दाखल झाला होता. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सुनील नंदवाळकर करीत आहेत.‘मतीन जहान से परेशान’ ग्रुपशहरात जहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीने वडाळारोडवर कार्यालय उघडले होते. या कार्यालयात त्यांनी विविध प्रलोभने दाखवून शेकडो नागरिकांकडून हजारो ते लाखो रुपये यात्रेच्या नावाखाली उकळले.त्यानंतर जुने नाशिकमधील राहत्या घरातून गाशा गुंडाळून परदेशात पोबारा केला. या फसवणूक झालेल्या संबंधीत लोकांची संख्या नाशिकसह विविध जिल्ह्यांत असून, नाशिकच्या काही तक्र ारदारांनी पुढे येऊन ‘मतीन जहान से परेशान’ नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमार्फत फसवणूक झालेल्या लोकांना आवाहन करत जोडले जात आहे.अद्याप एकही संशयित ताब्यात नाहीहज-उमराह यात्रेच्या नावाखाली शेकडो नागरिकांना गंडा घालणाºया संशयितांपैकी अद्याप एकाही संशयिताला पोलिसांनी अटक केलेली नाही हे विशेष! संशयित मनियार कुटुंबाने शहरातून नव्हे तर देशातून धूम ठोकली असून, लंडन शहरात ही मंडळी वास्तव्यास असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी