शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

हज यात्रेकरू तिरंग्याला करणार ‘सलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:41 IST

नाशिक : सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या जागतिक हज यात्रेसाठी जिल्हाभरातून यंदा सुमारे दोन हजार यात्रेकरू जाणार आहेत. राज्याच्या हज कमिटीमार्फत ...

नाशिक : सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या जागतिक हज यात्रेसाठी जिल्हाभरातून यंदा सुमारे दोन हजार यात्रेकरू जाणार आहेत. राज्याच्या हज कमिटीमार्फत जिल्ह्यातील ११०० यात्रेकरूंची यात्रा निश्चित करण्यात आली आहे. यात्रेवर जाताना तिरंगा सोबत बाळगणार असल्याचा निर्धार जिल्ह्यातील यात्रेकरूंनी प्रशिक्षण शिबिरात केला. १० आॅगस्टला यात्रा पूर्ण होणार असून, १५ आॅगस्ट रोजी मक्केत भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत तिरंग्याला ‘सलाम’ करण्याचा मानस मुस्लीम बांधवांनी व्यक्त केला.इस्लाम धर्मातील पाच मूलस्तंभांपैकी एक असलेल्या ‘हज’ला जगभरातून सौदीच्या मक्का-मदिना शरीफमध्ये दरवर्षी मुस्लीमबांधव मोठ्या संख्येने दाखल होतात. आॅगस्ट महिन्यात सुरू होणाºया या यात्रेसाठी जिल्ह्यातून सुमारे दोन हजार मुस्लीम बांधव जाणार आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सुमारे चारशे भाविकांचा सहभाग आहे. महाराष्टÑ हज कमिटीच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने हज यात्रा पूर्व प्रशिक्षण शिबिराचे गुरुवारी (दि.२७) शर्मा मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शहर-ए-खतीब अलहाज हिसामुद्दीन अशरफी, मौलाना मुझफ्फर अत्तार, जिल्हा समन्वयक तथा प्रशिक्षक जहीर शेख, शोएब मेमन, गुलजार कोकणी आदी उपस्थित होते. धार्मिक पद्धती नियम, अटी घ्यावयाची काळजी आदींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. हज कमिटीकडून जिल्ह्यातील ११०० यात्रेकरुंची यात्रा निश्चित करण्यात आली आहे...अशी घ्यावी खबरदारीहज यात्रेकरूंनी सोबत ४० किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान बाळगू नये. अत्यावश्यक मदतीबाबत जागरूक रहावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत धावपळ करून चेंगराचेंगरीला निमंत्रण देऊ नये, सुरक्षित ठिकाणी आधार घ्यावा, एकमेकास सहकार्य करावे, भारतीय स्वयंसेवकांची मदत घ्यावी, जेद्दाह विमानतळावर उतरल्यानंतर भारतीय यात्रेकरूंना मार्गदर्शनासाठी स्वतंत्ररीत्या व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय तिरंगा ही प्रमुख ओळख प्रत्येक यात्रेकरूने लक्षात ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.सोबत हवा तिरंगाभारतीय यात्रेकरू या नात्याने हजला जाणाºया नागरिकांनी सोबत राष्टÑध्वज बाळगावा. जेणेकरून १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर आपल्या तिरंग्याला सलाम करता येईल, असे जिल्हा प्रशिक्षक जहीर शेख यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी उपस्थित यात्रेकरूंनीही त्यांच्या आवाहनाला दाद देत ‘आमीन’ म्हणत प्रतिसाद दिला. देशाच्या एकात्मता व जातीय सलोखा आणि प्रगतीसाठी अल्लाहच्या दरबारात दुवा करण्याचाही मानस यावेळी बोलून दाखविला.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious Placesधार्मिक स्थळे