सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

By Admin | Updated: May 1, 2017 00:14 IST2017-05-01T00:14:05+5:302017-05-01T00:14:14+5:30

सिन्नर : तालुक्यात रविवारी दुपारीअवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

Hailstorm with storm wind in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

 सिन्नर : तालुक्यात रविवारी दुपारी
अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह कमी-अधिक प्रमाणात अनेक
गावांमध्ये सुमारे तासभर पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीटही झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
शिवडे, नांदूरशिंगोटे, पांगरी भागात जोरदार गारपीट झाली. कणकोरी, मानोरी, मऱ्हळ, देवपूर, वडांगळी, ठाणगाव, गुळवंच, कोनांबे परिसरात वादळी वाऱ्यासह कमी-अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस झाला.
नांदूरशिंगोटेत सुमारे एक तास पाऊस सुरु होता. पांगरी परिसरात २० मिनिटे पाऊस चालल्यानंतर परिसरात गारांचा खच पडला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात ठेवलेला कांदा, वैरण झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. (वार्ताहर)

Web Title: Hailstorm with storm wind in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.