शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गारठा वाढला : पारा थेट ७ अंशापर्यंत घसरला; नाशिककरांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:59 IST

चालू वर्षी नव्या वर्षाचा पहिला दिवस थंडीने चांगलाच गाजविला. कारण त्यादिवशी सर्वाधिक कमी ६.२ इतके किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभरानंतर पुन्हा पारा ६.९ अंशापर्यंत खाली घसरला. यावर्षी थंडीचा कडाका अधिक असून नाशिककर वाढत्या थंडीने हैराण झाले आहे.

ठळक मुद्देयावर्षी थंडीचा कडाका अधिक उबदार कपडयांचा वापरावर भर

नाशिक : शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहे. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेय ७ अंशापर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. काश्मिरच्या द्रास भागात उणे तीशीपार तापमान गेल्याने बर्फ गोठला आहे. मोठ्या प्रमाणात हिमालय व काश्मिरमध्ये हिमवृष्टी होत असल्याने शीतलहर कायम आहे. परिणामी उत्तर महाराष्टÑात वातावरण अधिकाधिक थंड झाले आहे. २०१८च्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये अधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. २०१८ साली २५ जानेवारी रोजी ७.२ इतके सर्वाधिक कमी किमान तापमान नोंदविले गेले होते. तर २०१७साली ११ जानेवारी राजी ५.८ आणि २०१६ साली जानेवारीअखेर सर्वात कमी ५.५ अंशापर्यंत पारा घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. चालू वर्षी नव्या वर्षाचा पहिला दिवस थंडीने चांगलाच गाजविला. कारण त्यादिवशी सर्वाधिक कमी ६.२ इतके किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभरानंतर पुन्हा पारा ६.९ अंशापर्यंत खाली घसरला. यावर्षी थंडीचा कडाका अधिक असून नाशिककर वाढत्या थंडीने हैराण झाले आहे. कारण डिसेंबर महिन्यात ५.२ अंशापर्यंत तापमान घसरले होते. त्यामुळे नागरिका गारठून गेले होते. जानेवारीच्या पंधरवड्यानंतर थंडीची लाट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; मात्र मकरसंक्रांतीनंतरदेखील थंडीची लाट कायम टिकून आहे. सूर्याचे उत्तरायण सुरू असूनदेखील वातावरणात अद्याप उष्मा जाणवत नसल्यामुळे प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. मागील आठवडाभरापासून नाशिककर थंडीच्या तीव्रतेचा सामना करत आहे. उबदार कपडयांचा वापरावर भर देत कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करताना दिसून येत आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये सलग बर्फवृष्टी; पारा उणे १४ तर द्रासमध्ये उणे३२ अंशापर्यंतजम्मू-काश्मिरमध्ये सलग सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे वातावरण अधिक थंड झाले आहे. जम्मूच्या लेहमध्ये उणे १७, गुलमर्गमध्ये उणे १२, पहलगाममध्ये उणे १४ तर कटरामध्ये ४.२ आणि श्रीनगरमध्ये उणे५.२ अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला आहे.राज्यातील ही शहरे गारठली (कंसात किमान तापमान)नागपूर (६.५मालेगाव (६.८)अकोला (६.८)नाशिक (७)अहमदनगर (७.२)गोंदिया (७.२)जळगाव (७.४)बुलढाणा (७.६)परभणी (८.२)पुणे (८.७)अमरावती (९.४)चंद्रपूर (९.४)बीड (९.६) 

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान