अमोदे परीसरात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:52 IST2021-03-20T21:20:07+5:302021-03-21T00:52:49+5:30

नांदगांव : तालुक्यातील अमोदे परिसरात शनिवारी (दि.२०) सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासह काही प्रमाणात गारपीट झाल्याने शेती पिकाचे नुकसान झाले.

Hail in Amode area | अमोदे परीसरात गारपीट

अमोदे परीसरात गारपीट

ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी

नांदगांव : तालुक्यातील अमोदे परिसरात शनिवारी (दि.२०) सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासह काही प्रमाणात गारपीट झाल्याने शेती पिकाचे नुकसान झाले.
दुपारी दोन वाजे नंतर हवामानात गारवा निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली. शेती पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून कांदा, गहू, मका पिकांबरोबरच खरबूज, टरभुज आदी पिकांना या पावसाचा फटका बसला असून वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.

Web Title: Hail in Amode area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.