शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

माणेकशानगरात घरांमध्ये नळाला गटारीचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:40 IST

शहरातील द्वारका परिसरात माणेकशानगरातील दहा ते बारा सोसायट्यांना नळाद्वारे गटारीचे पाणी येत असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केवळ खोदकाम सुरू असून, त्यात कुठलाही दोष सापडलेला नाही आणि दुसरीकडे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

नाशिक : शहरातील द्वारका परिसरात माणेकशानगरातील दहा ते बारा सोसायट्यांना नळाद्वारे गटारीचे पाणी येत असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केवळ खोदकाम सुरू असून, त्यात कुठलाही दोष सापडलेला नाही आणि दुसरीकडे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.महापालिकेच्या वतीने शहर स्मार्ट केले जात आहे. त्यातच जलवाहिन्या बदलून मोठ्या प्रमाणात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर स्काडा मीटर बसवून पाणीपुरवठा स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे स्मार्ट यंत्रणेला गेल्या चार दिवसांपासून साधा फॉल्टदेखील सापडत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.माणेकशानगर येथील न्यू रश्मी, बालाजी, जीवनज्योती अशा विविध सोसायट्या आणि बंगले परिसर असून, त्याठिकाणी महापालिकेच्या जलवाहिनीतून गटारीचे पाणी मिसळले जात आहे. घरातील पाणी काळे आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांनी त्यासंदर्भात महापालिकेच्या ई-कनेक्ट अ‍ॅपवर तक्रारी केल्या. त्यानंतर यंत्रणा हालली, मात्र चार दिवसांपासून महापालिकेचे तीन ते चार कर्मचारी येऊन खोदकाम करतात आणि नंतर निघून जातात. फॉल्ट सापडत नाही असे सांगून टाळाटाळ केली जात आहे.नागरिकांना मात्र त्यामुळे काळ्या पाण्याची शिक्षा सहन करावी लागत आहे. परिसरातील सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये काळा गाळ साचला आहे.तातडीने उपाययोजना करण्याची मागणीनागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करूनदेखील बघतो करतो, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहितेमुळे थेट पुढे येऊन काम करता येत नाही असे सांगून नगरसेवक टाळाटाळ करीत करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.४प्रदूषित पाण्यामुळे परिसरात रोगराईचा धोका असून, महापालिकेने त्वरित नागरिकांची या समस्येतून मुक्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी