प्रबोधनासाठी गुटख्याची होळी
By Admin | Updated: March 24, 2016 00:02 IST2016-03-24T00:01:08+5:302016-03-24T00:02:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम : व्यसनाधिनता सोडण्याचा संदेश

प्रबोधनासाठी गुटख्याची होळी
सिडको : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने होळी सणानिमित्त गुटख्याची होळी करून व्यसनाधिनता सोडण्याचा संदेश देत समाजापुढे एक अनोखा आदर्श आदर्श ठेवला.
दरवर्षी पारंपरिक पध्दतीने साजरा होत असलेला होळीचा सण आता वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे. होळीनिमित्त काही ठिकाणी वृक्षतोड करून होळी साजरी केली जाते. सध्या रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. परंतु या सर्व गोष्टीला फाटा देत सिडको विभागात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष वैभव देवरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मध्य विधानसभा अध्यक्ष धिरज मगर यांच्या हस्ते गुटख्याची होळी करण्यात आली. तसेच यापुढील काळात कोणीही गुटखा खाऊ नये याबाबत जनजागृती करण्यात आली. होळीनिमित्त आम्ही सृष्टीचे शिलेदार करू धरती हिरवीगार, वाढवून झाडांचा हिरवा साज आपलेच आयुष्य वाढवू आज, झाडे लावा झाडे जगवा यांसह इतर समाजहित जपणारे फलक वृक्षांजवळ लावल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी सिडको
विभाग अध्यक्ष मुकेश शेवाळे, विशाल पगार, सचिन आव्हाड, अतिश निपुंगे, जगदीश अहिरराव, दीपक वाघ, विशाल गोलाईत, राजाभाऊ गोलाईत, अभिजित नवले, श्रेयस कदम, विकी बागुल, भूषण चोपडे, धनंजय खांडे, नितीन परदेशी आदि सहभागी झाले होते.
(वार्ताहर)