भद्रकालीत लाखो रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

By Admin | Updated: January 14, 2015 23:47 IST2015-01-14T23:46:47+5:302015-01-14T23:47:15+5:30

गुन्हा दाखल : अन्न आणि औषध विभागाची कारवाई

Gutka, aromatic tobacco worth lakhs of rupees was seized in Bhadrakalite | भद्रकालीत लाखो रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

भद्रकालीत लाखो रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

नाशिक : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भद्रकाली परिसरात मंगळवारी टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे़
भद्रकालीतील दूधबाजार परिसरात राहणारे संशयित रशीद लतीफ मेमन यांच्या शाह सादीक पॅलेसमधील गुदामावर मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला़ त्यामध्ये विमल व हिरा गुटखा तसेच मीराज तंबाखू, सुगंधित पानमसाला असा सुमारे एक लाख २६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला़
दुसरा छापा मुदतसर नजर जफर अहमद अन्सारी यांच्या मालकीच्या गुदामावर टाकण्यात आला़ त्यामध्ये २० पोलिपॅक, तीन गोण्यांमध्ये १८ हजार ५५० पाऊच पानमसाला, ६० पॉलिपॅक सेंटेड तंबाखू, २५ पॉलिपॅक असा सुमारे ६४ हजार १५० रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला़ या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अमित रासकर, सुवर्णा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Gutka, aromatic tobacco worth lakhs of rupees was seized in Bhadrakalite