विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्याचा गुरुजनांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:22 IST2020-09-07T22:17:24+5:302020-09-08T01:22:44+5:30
नाशिक : केवळ शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविणारे शिक्षक म्हणजे गुरु असतात असे नाही, तर जीवनाच्या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भेटत असतात. आपल्याकडील गुरु-शिष्य परंपरा खूप मोठी आहे. आपल्या शिष्याने समाजात खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते म्हणून ते वेळोेवेळी विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात, असे प्रतिपादन सूर्यादत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया यांनी केले.

विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्याचा गुरुजनांचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केवळ शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविणारे शिक्षक म्हणजे गुरु असतात असे नाही, तर जीवनाच्या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भेटत असतात. आपल्याकडील गुरु-शिष्य परंपरा खूप मोठी आहे. आपल्या शिष्याने समाजात खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते म्हणून ते वेळोेवेळी विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात, असे प्रतिपादन सूर्यादत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त ‘लोकमत’ आणि सूर्यादत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आॅनलाइन शिक्षक सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना डॉ. चोरडिया म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळे भावनिक नाते निर्माण झालेले असते.
आपल्या विद्यार्थ्याने खूप मोठे व्हावे, समाजात नाव कमवावे यासाठी शिक्षक नेहमीच त्यांना आपल्याकडील अधिकाधिक चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी शिक्षकांनाही वेळोवेळी होणारे बदल स्वीकारावेलागतात. एका अर्थाने शिक्षक आयुष्यभर स्वत: शिकत असतात, अनेक बदल स्वीकारत असतात. आपल्याला आलेले अनुभव शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात. यातून भावी पिढी समृद्ध होत असते, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी केले. विद्यार्थी घडविण्यासाठी अनेक शिक्षक स्वत: कष्ट घेऊन स्वत:चे ज्ञान अद्ययावत करत असतात. अशा शिक्षकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याने ‘लोकमत’ने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे ते म्हणाले. यावेळी ई-प्रमाणपत्र देऊन ३४ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विविध शाळांचे शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच महिन्यात तर शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात बदल आत्मसात करून स्वत:ला अपडेट केले आहे. आजच्या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक शिक्षक आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. यामुळेच देशाची भावी पिढी आज सुरक्षित हातात आहे, असे गौरवोद्गारही डॉ. चोरडिया यांनी काढले.