गुरुकुलचे खेळाडू कांस्य व रौप्य पदकाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:24 IST2019-07-09T18:23:52+5:302019-07-09T18:24:22+5:30
येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी तुळजापूर( उस्मानाबाद) येथे दि.५जुलै ते७जुलै या दरम्यान१० व१२वर्षा आतील महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन याच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता

येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक गुरु कुलातील तलवारबाजीतील विजेत्या स्पर्धकांसह अध्यक्ष हनुमंत भोंगळे, प्राचार्य राजेश पाटील,तेजस राऊत.
जळगाव नेऊर...येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी तुळजापूर( उस्मानाबाद) येथे दि.५जुलै ते७जुलै या दरम्यान१० व१२वर्षा आतील महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन याच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता .
तसेच नाशिक जिल्ह्यातील२५खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले .यात आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल पुरणगाव येथील४ मुले व ३ मुली यांनी सहभाग नोंदवला होता . त्यात तलवारबाजी मधील सायबर या प्रकारात विपुल वसावे ,अनिल वसावे, आशिष वसावे यांनी नाशिक संघाला कांस्य पदक मिळवून दिले ,
तसेच१० वर्ष आतील वैयिक्तक ईपी या प्रकारात शुभम वसावे याने रौप्य पदक मिळवून दिले .
मुलीमध्ये श्रुती रोठे ,वेदिका पवार ,अर्चना पावरा यानी सहभाग नोदवला.
यशस्वी खेळाडूंना अध्यक्ष हनुमंत भोंगळे,उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, संत सेवादास महाराज , प्राचार्य राजेश पाटील , क्र ीडा प्रशिक्षक अमोल आहेर क्र ीडा शिक्षक प्रवीण घोगरे,योगेश गागुर्डे ,ऋतिक भाबड आदींचे मार्गदर्शन लाभले.