दरेगावात ११ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:53 IST2018-08-12T21:52:37+5:302018-08-12T21:53:18+5:30

मालेगाव तालुक्यातील दरेगाव येथे आज सकाळी आठ वाजता विशेष पोलीस पथक व पवारवाडी पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत पीकअप वाहनातुन अवैध गुटखा वाहतूक करताना ११ लाखाच्या गुटख्यासह एकूण १५ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून मनपाचे अन्नसुरक्षा अधिकारी गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Gurkha seized 11 lakh in Dera Gaya | दरेगावात ११ लाखांचा गुटखा जप्त

दरेगावात ११ लाखांचा गुटखा जप्त

पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वांगडे, विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांच्या पथकाने सकाळी आठ वाजता महामार्गालगत दरेगाव येथे नाकाबंदी करुन पीकअप वाहन (क्र. एम.एच.४१ ए. जी. २५४७) मधुन शासनाने प्रतिबंधीत केलेल्या विविध कंपनीचा सुगंधीत गुटखा पानमसाला व तंबाखु असा ११ लाखांचा माल जप्त केला. वाहतूक करणारे मोहंमद हनीफ मोहंमद रजा सिद्दीकी व शरीफ मेमन उर्फ शरीफ कच्ची यांना ताब्यात घेतले. सदर पथकात पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, पो. ना. कडनोर, पाटील, पोलीस हवालदार देविदास निकम, नितेश खैरनार, दिनेश शेरावत, अभिजित साबळे यांचा समावेश होता.

Web Title: Gurkha seized 11 lakh in Dera Gaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा