आहुर्लीत ग्रामस्थांतर्फे गुंजाळ यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:49+5:302021-09-07T04:17:49+5:30

नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते आहुर्ली येथे आले होते. यावेळी सर्वसामान्य व्यक्तीला थेट प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने तालुक्यात ...

Gunjal felicitated by villagers in Ahurli | आहुर्लीत ग्रामस्थांतर्फे गुंजाळ यांचा सत्कार

आहुर्लीत ग्रामस्थांतर्फे गुंजाळ यांचा सत्कार

नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते आहुर्ली येथे आले होते. यावेळी सर्वसामान्य व्यक्तीला थेट प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. स्व. गोपाळराव गुळवे यांच्या विचारांचे हे यश असून, तालुक्याचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने गुंजाळ यांचा श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, उपसरपंच गोविंद खकाळे, चेअरमन मधुकर गायकर, बबन गायकर, माजी उपसरपंच निवृत्ती गायकर, नांदडगावचे चेअरमन रघुनाथ खातळे, प्रभाकर महाले, गणपत खकाळे, किसन गायकर, तुकाराम खकाळे, सरपंच तुकाराम गायकर, गणेश खकाळे, शरद खकाळे, अरुण खकाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - ०६ गोंदेदुमाला १

आहुर्ली येथील काॅंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश चिटणीस भास्कर गुंजाळ यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.

060921\06nsk_6_06092021_13.jpg

आहुर्ली येथील काॅंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश चिटणीस भास्कर गुंजाळ यांचा सत्कार करतांना ग्रामस्थ.

Web Title: Gunjal felicitated by villagers in Ahurli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.