Gulvanch, Bhikusa School I | सूर्यनमस्कारात गुळवंच, भिकुसा विद्यालय प्रथम

गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी संजय बर्वे, चंद्रशेखर कोरडे, प्रकाश सानप, विठ्ठलराजे उगले, बापूसाहेब पंडित, बाळासाहेब हांडे, समाधान गायकवाड, शांताराम गुरुळे, सुरेश जोंधळे, अमोल चव्हाण, चैतन्य कासार, राजेंद्र वाघेपाटील, चंद्रशेखर बर्वे आदी.

ठळक मुद्देसिन्नर : गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणासह सारडा विद्यालयात व्यायामाबाबत मार्गदर्शन

सिन्नर : येथील पुरातन गोंदेश्वर मंदिर प्रांगणात कस्तुरी नागरी पतसंस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने रथसप्तमीनिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी गटास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक गटात गुळवंच तर माध्यमिक गटात भिकुसा विद्यालयाने बाजी मारली.
गोंदेश्वर मंदिरात सूर्यनमस्कार स्पर्धेचे उद्घाटन कस्तुरी पतसंस्थेचे संचालक संजय बर्वे, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोरडे आणि प्रकाश सानप यांच्या हस्ते झाले. राजेंद्र वाघ यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, बापूसाहेब पंडित, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, संघाचे तालुका कार्यवाह समाधान गायकवाड, शांताराम गुरुळे, सुरेश जोंधळे, अमोल चव्हाण, रोटरी क्लबचे अध्यक्ष चैतन्य कासार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामकृष्ण मानकर यांनी केले, तर परीक्षण गणेश तांबोळी व चंद्रशेखर बर्वे यांनी केले.
ब. ना. सारडा विद्यालय, सिन्नर
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय येथे कै. खंडेराव बळवंत लेले तालुकास्तरीय सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धा पार पडली. यावेळी डॉ. पंकज नावंदर, अ‍ॅड. धीरेंद्र पोंक्षे, उपाध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, बापूसाहेब पंडित, अनिल पवार, माधवी पंडित उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सूर्य प्रतिमा व कै. खंडेराव लेले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. राहुल मुळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. क्रीडाशिक्षक कांतिलाल राठोड, छाया मढे यांनी सूत्रसंचालन केले, रोहिणी परदेशी यांनी आभार मानले.
जनता विद्यालय, पांढुर्ली
तालुक्यातील पांढुर्ली विद्यालयात सूर्य उपासना सामुदायिक सूर्यनमस्कार स्पर्धेत ११०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सूर्यावाचून काहीच व्यवहार चालत नाही, त्याचे महत्त्व खूप मोठे आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका व्ही. पी. उकिर्डे यांनी केले. विलास गोसावी यांनी संयोजन केले.
यावेळी पर्यवेक्षक एम. एस. अहिरे, डी. जी. हगवणे आदी उपस्थित होते. परीक्षकांनी निरीक्षण करून पाच आदर्श मुले व पाच मुली असे प्रत्येकी पाच क्रमांक काढण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा, गोंदे
तालुक्यातील गोंदे येथील प्राथमिक शाळेत सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके
केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधाकर धनराव, उत्तम ढोली,
संजय आव्हाड, संपत केदार,
टी. ए. लवटे, एकनाथ खाडे, बंडू लहांगे, सुनील जोरी, राजश्री सोनवणे, बी. ए. वाजे, मनीषा क्षीरसागर, सुनीता चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Gulvanch, Bhikusa School I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.