जिल्हाधिकारी कार्यालयाला गुलाबपुष्प
By Admin | Updated: January 12, 2016 22:51 IST2016-01-12T22:47:08+5:302016-01-12T22:51:09+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाला गुलाबपुष्प

जिल्हाधिकारी कार्यालयाला गुलाबपुष्प
मालेगाव : येथील महादेव घाट मंदिर ते संगमेश्वर दरम्यानच्या पादचारी पुलाचे काम करावे, या मागणीसाठी येथील काकाणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात गुलाबपुष्पाचे वाटप केले.
रामसेतू पुलावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत मोठी वाहतूककोंडी होते. त्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. यामुळे या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. यावर येथील महापालिकेतर्फे मोसम नदीवर रामसेतू पुलाच्या शेजारी पादचारी पूल मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे मार्च २०१५ मध्ये सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती आहे. हा पूल नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा संकल्प तत्कालीन मनपा आयुक्तांनी केला होता. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर या कामास अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. या कामात लक्ष घालावे, यासाठी काकाणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह अपर जिल्हाधिकारी कार्यालयात गुलाबपुष्प देण्याचे आंदोलन केले. (प्रतिनिधी)