शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

हेल्मेट वापरणाऱ्या नाशिककरांना गुलाब अन् तुळस; न वापरणाऱ्यांना पाचशेचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 2:56 PM

पोलिसांकडून हेल्मेट परिधान करून प्रवास करणा-या नाशिककरांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुलाबपुष्प, तुळसचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांनी हेल्मेटकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडून ५०० रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

ठळक मुद्दे५२० पोलीस ५२ अधिका-यांचा ताफा हेल्मेट-सीटबेल्ट सक्तीची तपासणी मोहीम

नाशिक : शहर व परिसरात पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये सोमवारी (दि.१३) सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात आले. मोहिमेचे ‘पॉइंट’ सोशलमिडियावर पुर्वसंध्येला तसेच सकाळी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेत हेल्मेट परिधान करून उंबरा ओलांडणे पसंत केले. त्यामुळे पोलिसांकडून हेल्मेट परिधान करून प्रवास करणा-या नाशिककरांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुलाबपुष्प, तुळसचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांनी हेल्मेटकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडून ५०० रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

शहरात वाढते दुचाकी अपघात आणि त्यामध्ये डोक्याला जबर मार लागून मृत्यूमुखी पडणा-यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. सर्व पोलीस ठाणे हद्दीतील २६ ते ३० पॉइंटवर संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वाहतूक पोलीसांनी संयुक्तरित्या कारवाई केली.

काही दुचाकीस्वार महिला-पुरूष मोपेड दुचाकीच्या डिक्कीत हेल्मेट ठेवून दुचाकी चालवितानाही पोलिसांना आढळून आले. यावेळी अशा वाहनचालकांना अडवून पोलीसांनी प्रबोधन करत हेल्मेट घालण्यास भाग पाडले व दंड माफ क रून समज दिली. शहरात पोलिसांनी हेल्मेटविना प्रवास करणा-याविंरूध्द दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम हाती घेतल्याने हेल्मेटखरेदीकडे नागरिकांची पावले वळल्याची दिसून आली.

यामुळे शहरातील हेल्मेटविक्रीच्या दुकानांवर अचानकपणे गर्दी वाढली. हेल्मेटला मागणी वाढल्याने विक्रेत्यांमध्ये समाधान व्यक्त होत होते. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईमुळे हेल्मेटविक्रीतून हजारो ते लाखो रूपयांची उलाढाल रविवारच्या संध्येपासून आज दुपारपर्यंत झाली.महाविद्यालयीन युवक-युवतीपासून दुधवाल्यापर्यंत सर्वच नाशिककरांनी मोठ्या संख्येने हेल्मेट वापरण्यावर भर दिल्याचे दिसून आले. यामुळे शहरातील प्रत्येक सिग्नलवर महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक दुचाकीस्वार हेल्मेटमध्ये पहावयास मिळाले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयbikeबाईकroad safetyरस्ते सुरक्षा