शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

नाशिक विमानसेवा बंद करून गुजरातच्या निवडणुकीचे उडान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:28 IST

उद्योजकांमध्ये चर्चा, 'अलायन्स एअर'ची विमाने इंदूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी वापरणार

नाशिक: सध्या गुजरातच्या निवडणुकांचा बोलबाला आहे. त्यामुळे वेदांता फॉक्सकॉन आणि टाटांचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकच्या 'उडान' सेवेला देखील गुजरात निवडणुकांचाच फटका बसल्याची चर्चा होत आहे. 'अलायन्स एअर'ने विमान सेवा बंद करण्यामागे तेच एक कारण असल्याचे सांगितले जात असून ही सेवा आता गुजरात इंदौर मार्गावर सुरू होणार असल्याची चर्चा सध्या उद्योग क्षेत्रात होत आहे.

नाशिकमधील उद्योग व्यावसायिक हे सातत्याने विकासाची कास धरत आहेत. मुंबई- पुणे- नाशिक हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. त्यात औरंगाबाद जोडून सुवर्ण चतुष्कोन मानला जातो. मात्र, चौकोनातील एक कोन कायम कमकुवत राहिला आहे, अशी नाशिककरांची भावना आहे. नाशिकला अनेक उद्योगपती चौकशी करतात; परंतु प्रकल्प अन्यत्र पळवले जातात. केवळ अन्य जिल्ह्यातच नाही तर अन्य राज्यातही नेले जातात. आता फॉक्सकॉन नाही; पण किमान टाटा एअरबसचा प्रकल्प नाशिकला होण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण होते. एचएएल येथील प्रकल्प सध्या सुरू असला तरी नवीन भरीव काम या ठिकाणी नाही. त्यातच विमानतळदेखील असून त्याचा एअरबससाठी उपयोग होऊ शकतो. मात्र, त्यामुळे नाशिकच्या काही उद्योजकांनी पुढाकार घेतला आणि तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले. त्यांनीही शासनाला पत्र पाठवले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.

एकीकडे उद्योग गुजरातला जात असताना नाशिकच्या विमान सेवेला देखील घरघर लागल्याचे दिसत आहे. एकेक करीत विमान कंपन्यांनी नाशिकची उड्डाणे बंद केली असून आता अलायन्स एअरची दिल्ली अहमदाबाद- नाशिक- पुणे- बेळगाव ही सेवा ३१ ऑक्टोबरपासून कोणत्याही सबळ कारणाशिवाय बंद होत आहे. त्यापूर्वी २३ ऑक्टोबरपासून स्टार एअरवेजची नाशिक- बेळगाव ही सेवाही बंद पडली आहे. मात्र, अलायन्स एअरच्या अन्य चार शहरांना जोडणाऱ्या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच केवळ गुजरातमध्ये होणाऱ्या संभाव्य निवडणुकांमुळे तेथील राजकीय उडान नीट व्हावे यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने नाशिकच्या सेवेत कपात करून ही येथील कंपनीची विमाने गुजरातमध्ये नेल्याची चर्चा आहे.

पाणी पळवले, आता विमानसेवाही....

महाराष्ट्राच्या हद्दीत पावसाचे पडणारे पाणी गुजरातला वाहून जाते. त्याबाबत महाराष्ट्र शासनाशी करार करण्याची तयारी सुरु आहे. त्याला विरोधही झाला आहे. आता पाण्याबरोबरच विमानसेवादेखील पळवली जात असल्याची उद्योजकांत चर्चा आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकGujaratगुजरातairplaneविमान