स्टाइसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:27 IST2019-12-24T00:26:35+5:302019-12-24T00:27:16+5:30
सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत संस्थेमध्ये संगमनेर येथील अमृतवाहिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भेट देत प्रशिक्षण घेतले.

सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत संगमनेर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष पंडित लोंढे. समवेत मीनाक्षी दळवी, अविनाश तांबे, रामदास दराडे, बाबासाहेब दळवी, कमलाकर पोटे आदी.
सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत संस्थेमध्ये संगमनेर येथील अमृतवाहिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भेट देत प्रशिक्षण घेतले.
तालुका औद्योगिक वसाहत संस्थेचे अध्यक्ष पंडित लोंढे, उपाध्यक्ष मीनाक्षी दळवी, संचालक अविनाश तांबे, रामदास दराडे, उद्योजक बाबासाहेब दळवी, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदींसह उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण संस्थेतील फिटर, डिझेल मेकॅनिक, कॉम्प्युटर या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील रिंग पल्स अॅक्वा, संटु आई इंडिस्ट्रिज, अभिजित इंजिनिअरिंग या कारखान्यास भेट देऊन कामाची माहिती घेतली. प्रशिक्षणासाठी अमृतवाहिनी आयटीआयचे ४० विद्यार्थी तसेच शिक्षक बाळासाहेब आहेर, सचिन मोरे, गणेश बागुल आदी उपस्थित होते.