कोटंबी वाचनालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:02 PM2019-09-03T23:02:04+5:302019-09-03T23:03:00+5:30

पेठ : आदिवासी विद्यार्थ्यांनी आता मोठी स्वप्ने पाहावीत. स्पर्धा परीक्षांचे आवाहन पेलण्याची शक्ती निर्माण करावी, असे आवाहन सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट यांनी केले.

Guide to Competitive Exam at the Kotambi Library | कोटंबी वाचनालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कोटंबी, ता. पेठ येथे वाचनालय मार्गदर्शनप्रसंगी डॉ. योगेश भरसट. समवेत प्रकाश गवळी, गिरीश गावित, शशिकांत भुसारे, रमेश चौधरी आदी.

Next
ठळक मुद्देमार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

पेठ : आदिवासी विद्यार्थ्यांनी आता मोठी स्वप्ने पाहावीत. स्पर्धा परीक्षांचे आवाहन पेलण्याची शक्ती निर्माण करावी, असे आवाहन सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट यांनी केले.
कोटंबी येथील वैभव वाचनालयास तालुक्याचे सुपुत्र आदिवासी विकास मंत्रालय सहायक सचिव योगेश भरसट यांनी भेट दिली. त्यांनी वाचनालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप तसेच महत्त्व व ती का द्यायची यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
याप्रसंगी एकता सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश गवळी, बाळू गवळी, गिरीश गावित, रमेश चौधरी, कवी देवदत्त चौधरी, प्रा. विजय वाघेरे, भास्कर गायकवाड, सरपंच राजू गवळी, नामदेव भुसारे, सरपंच रंजना भुसारे, सुधाकर राऊत, शशिकांत भुसारे, दिलीप भुसारे, मधुचंद्र गावित, हेमराज गांगोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Guide to Competitive Exam at the Kotambi Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा