नांदूरवैद्य येथे महिलांना शेतीशाळेद्वारे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:45 IST2020-06-20T16:44:41+5:302020-06-20T16:45:14+5:30
नांदूरवैद्य : शेतकरी महिलांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून शेतमालाचे उत्पादन वाढवावे. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षित होऊन निर्णय क्षमतेच्या बळावर कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावा हाच शेतीशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे कृषी पर्यवेक्षक प्रियांका पांडुळे यांनी इगतपुरी तालुक्यातील उभाडे तसेच खेड येथे आयोजित केलेल्या महिला शेतीशाळेच्या कार्यशाळेप्रसंगी सांगितले.

नांदूरवैद्य येथे महिलांना शेतीशाळेद्वारे मार्गदर्शन
नांदूरवैद्य : शेतकरी महिलांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून शेतमालाचे उत्पादन वाढवावे. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षित होऊन निर्णय क्षमतेच्या बळावर कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावा हाच शेतीशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे कृषी पर्यवेक्षक प्रियांका पांडुळे यांनी इगतपुरी तालुक्यातील उभाडे तसेच खेड येथे आयोजित केलेल्या महिला शेतीशाळेच्या कार्यशाळेप्रसंगी सांगितले.
इगतपुरी तालुक्यात कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांच्या मार्गदर्शनाखाली २९ शेतीशाळा राबविण्यात येणार आहे. या शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक आठवड्यात पिकांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भातपिकांच्या परिसंस्थेचा अभ्यास केल्यामुळे महिला शेतकऱ्यांना पिकांवर पडणाºया किडींवरील फरक तसेच किडीचे नियंत्रण कसे करावे याचे ज्ञान होणार आहे. तसेच त्यांची निरीक्षण शक्ती वाढणार असल्याचे कृषी मंडळ अधिकारी किशोर भरते यांनी आयोजित महिला शेतीशाळेप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी कृषी सखी सुवर्णा सुरु डे, उद्योग सखी जयश्री सुरुडे, बचतगट प्रेरिका मथुरा सुरुडे, माजी सरपंच कमळा गोनके, कृषी मंडळ अधिकारी किशोर भरते, कृषी सहायक रूपाली बिडवे, कृषी पर्यवेक्षक प्रियांका पांडुळे आदींसह कृषी मंडळाच्या महिला शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
(फोटो २० नांदूरवैद्य)
इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे महिला शेतकºयांना शेतीशाळेत मार्गदर्शन करताना प्रियांका पांडुळे. समवेत किशोर भरते, रूपाली बिडवे व महिला शेतकरी.