मातृ दिनानिमित्त प्रसूतीनंतरची देखभाल विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:13 IST2021-05-10T04:13:55+5:302021-05-10T04:13:55+5:30
नाशिक : मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालयातील कुटुंब व बालकल्याण विभागामार्फत मातृत्व दिनानिमित्त रविवारी (दि. ९) एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या ...

मातृ दिनानिमित्त प्रसूतीनंतरची देखभाल विषयावर मार्गदर्शन
नाशिक : मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालयातील
कुटुंब व बालकल्याण विभागामार्फत मातृत्व दिनानिमित्त रविवारी (दि. ९) एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका कल्पना निकाळे यांनी सुरक्षित मातृत्व व गरोदर मातांनी घ्यायची काळजी या विषयावर एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
अंगणवाडीत आयसीडीएस योजनेअंतर्गत गरोदर मातांनी नाव नोंदणी केल्यानंतर आरोग्य विभागामार्फत तपासणी करून केले जाणारे लसीकरण अतिशय महत्त्वाचे असून गरोदर मातांना लसीकरण, आहार आरोग्यविषयक माहिती अंगणवाडीत दिली जाते. गरोदर मातेने दर महिन्याला तपासणी करणे, लोहयुक्त गोळ्यांचे नियमित सेवन करणे व पूरक पौष्टिक आहार घेणे प्रसूतिपूर्व नियोजन करणे व प्रसूती दवाखान्यातच करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या वेबिनारसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, समन्वयक प्रा. सुनीता जगताप व महाविद्यालयातील कुटुंब व बालकल्याण विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.